Ad will apear here
Next
आनंदस्वर ज्येष्ठांसाठी
‘जनरेशन गॅप’ हा शब्द नव्या व जुन्या पिढीसंदर्भात वापरला जातो. दोन्ही पिढ्यांमध्ये विचारांचे अंतर हे असणारच आहे; पण अनेकदा वृद्धांचा कुरबुर स्वभाव, सतत अनाहूत सल्ले देणे यामुळे गैरसमजाची ‘गॅप’ वाढत जाते. हे टाळून ‘सेकंद इनिंग्स’ प्रसन्न, आनंदी कशी करता येईल याबद्दल रोहिणी पटवर्धन यांनी ‘आनंदस्वर ज्येष्ठांसाठी’मधून सहज, सोपे मार्गदर्शन केले आहे.

वृद्धांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचे ‘प्रॅक्टिकल बुक’ असे या पुस्तकाचे वर्णन लेखिकेने केले आहे. साठीनंतर समृद्ध आयुष्य जगण्यासाठीची संकल्पना ‘passion’ या शब्दातून स्पष्ट केली आहे. वृद्धवैद्यकशास्त्र आणि वृद्धाकल्याणशास्त्र याची माहिती, ज्येष्ठांसाठी जादूचा दिवा ठरणारा मोबाइल फोनचा वापर, ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता, ज्येष्ठ व एकट्या स्त्रियांचे प्रश्न, समाजकार्यात झोकून देणे, ज्येष्ठांनीच ज्येष्ठांना मदत करणे, वृद्धाश्रमांची गरज, त्यांची निवड कशी करावी, परदेशी राहणाऱ्या मुलांच्या पालकांच्या समस्या, मृत्यूला स्वीकारण्याची तयारी व त्याआधी मृत्युपत्र तयार करणे आदी सर्व गोष्टींवर यात मार्गदर्शन केले आहे. जोडीला उदाहरणेही दिली असल्याने ते मुद्दे अधिक जवळचे वाटू शकतात.    

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : ८४
किंमत : १०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZXQBV
Similar Posts
युद्धखोर अमेरिका जगातील सर्वांत बलाढ्य, संपन्न देश असे अमेरिकेचे वर्णन केले जाते. हे खरे असले, तरी त्याला दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे या देशाची वर्चस्ववादी वृत्ती. स्वहितासाठी काहीही, कोणत्याही प्रकारे मिळविण्याच्या अमेरिकेच्या प्रवृतीवर अतुल कहाते यांनी ‘युद्धखोर अमेरिका’मधून प्रकाश टाकला आहे.
युनायटेड वेस्टर्न बँक कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे
पुनर्जन्म मिथ्य की तथ्य पौराणिक कथांमध्ये पुनर्जन्माचे अनेक दाखले देण्यात येतात. खरेच असतो का पुनर्जन्म, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांनी प्रयत्न केला आहे. पुनर्जन्म का, कसा, केव्हा, कोणाचा होतो यांचा विचार पुस्तकात प्रारंभी केला आहे.
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) वर्षानुवर्ष नियमितपणे आयकर भरणाऱ्यांनासुद्धा आयकर कायद्याची संपूर्ण माहिती नसते. ही माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळेसुद्धा ती नीट वाचली जात नाही; पण प्रत्येक करदात्याला हे माहित असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अरुण गोडबोले यांनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी हे पुस्तक लेखन केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language